मैं और मेरी तन्हाई, अक्सर एक-दुसरें से बाते किया करते हैं!
खरं तर मी एकटी राहते, म्हणजे खूप भयंकर काहीतरी करते, किंवा मला कुणी सहानुभूती दाखवावी अशी अवस्था आहे, असं मला अजिबात वाटत नव्हते. मात्र इतरांना यासाठी मी दयेस पात्र आहे, असं का वाटावं, हेही कळत नव्हतं. अजूनही कळत नाही. एकटेपणाला एवढं घाबरण्यासारखं आहे काय? बरं, जी व्यक्ती एकटेपण बायचॉईस स्वीकारते, तिचीही लोक फार काळजी करतात. असं का? एकटेपण हे खरंच एवढं भयभीत करणारं प्रकरण आहे काय?.......